संत तुकाराम वनग्राम योजने अंतर्गत स्पर्धेत दापोलीतील खेर्डी वन समिती जिल्ह्यात प्रथम


संत तुकाराम वनग्राम योजना सन २०२४-२५ अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत दापोली तालुक्यातील खेर्डी येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल समितीला शासनाकडून ५१ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक चिपळूण तालुक्यातील मालदोली येथील समितीला मिळाला असून त्यांना ३१ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
रत्नागिरी चिपळूण वन विभागामार्फत ही स्पर्धा घेण्यात आली होती. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत विविध निकषांवर समित्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये खेर्डी येथील समितीने सर्वच बाबींमध्ये सरस कामगिरी करत अब्बल स्थान मिळवले. या स्पर्धेत वनीकरण, मृद व जलसंधारण, वनसंरक्षण, वनवणवा प्रतिबंध, अतिक्रमण रोखणे, अवैध चराईवर नियंत्रण, वन्यजीवांसाठी पाणवठ्यांची निर्मिती, लोकसहभाग, महिलांचा सहभाग, पर्यायी इंधन वापर, निधीचा योग्य वापर, अभिलेख व्यवस्थापन, नवकल्पना आणि विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती अशा विविध घटकांवर मूल्यांकन करण्यात आले.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ८४ गावांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत. तालुकास्तरावरून निवड झालेल्या सात समित्यांमधून जिल्हास्तरासाठी अंतिम निवड करण्यात आली. खेर्डी समितीचा प्रस्ताव आता राज्यस्तरीय पुरस्कारासाठी कोल्हापूर वनवृत्तामार्फत पाठवण्यात येणार आहे या यशामध्ये समितीच्या अध्यक्षा व सरपंच रिया पवार, उपसरपंच शरद तांबे, वनरक्षक विश्वंभर झाडे तसेच सदस्य सचिव दापोली वनपाल रामदास खोत यांचे विशेष योगदान लाभले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button