
टँकर जप्त करून मालकासह कंपनीवर गुन्हा दाखल करा, कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक
लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड विरोधात कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून, पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये सांडपाणी भरल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित टँकर जप्त करून कंपनीसह टैंकर मालक आणि चालकावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी मंगळवारी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक देत केली.
मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी उत्कर्ष शिनगारे यांच्याशी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे, सिराज दलवाई, पंकज दळवी, अल्ताफ तुळशीराम पवार, काद्री, बाबा चव्हाण, स्वाती भोजने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सविस्तर चर्चा करत या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले गेल्या आठवड्यात कंपनीतून साडपाणी भरून निघालेला टॅकर सीईटीपीजवळ अडवण्यात आला. पिण्याचे पाणी वाहतूक करण्यासाठी वापरला जाणारा बैंकर या सांडपाणी वाहतुकीसाठी कसा वापरला गेला, असा सवाल करत याबाबत कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.www.konkantoday.com




