
मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन
रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे यंदाही हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त १ आणि २ एप्रिल रोजी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
३१ मार्च मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर ६ ते रात्री यावेळेत लहान मुलांचे फनी गेम्स, तर ८ वाजता महिलांचे व मुलांचे विविध कार्यक्रम होईल. १ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता जिल्हास्तरीय राम-रावण स्पर्धा घेतली जाणार आहे. २ एप्रिल रोजी पहाटे ५.३० वाजता काकड आरतीने सुरुवात होईल. सकाळी ७.३० वाजता मारुतीवर अभिषेक केला जाईल. १० वाजता सत्यनारायणाची महापूजा, तर दुपारी १२ ते ४ यावेळेत महाप्रसादाचे वाटप केले जाईल. सायंकाळी ४ ते ८ यावेळेत मारुतीची शोभायात्रा, तर रात्री ८ ते ९ यावेळेत लक्ष्मीकांतवाडीचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री १० वाजता माभळे, जाधववाडी (ता. संगमेश्वर) श्री ग्रामदेवता लोककला नाट्य नमन मंडळातर्फे गण अग्नीसुराचा वध, गवळण, वगनाट्य “सैतानी डाव” यांचे सादरीकरण केले जाईल.
हे सर्व कार्यक्रम लक्ष्मीकांतवाडी (मिरजोळे) पाटमैदान येथे होणार असून, भाविकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




