इराणला झालेल्या सर्व नुकसानीची भरपाई मिळेपर्यंत आणि निर्बंध उठवले जाईपर्यंत हे युद्ध सुरूच राहील, इराणची घोषणा


डोनाल्ड ट्रम्प यांनी इराविरुद्धच्या युद्धात नरमाईची भूमिका घेतली असली तरी इराणने मात्र हे युद्ध सुरुच राहणार असल्याचे म्हटले आहे. “इराणला झालेल्या सर्व नुकसानीची भरपाई मिळेपर्यंत आणि निर्बंध उठवले जाईपर्यंत हे युद्ध सुरूच राहील,” असे इराणच्या सर्वोच्च नेत्याचे लष्करी सल्लागार मोहसेन रेझाई यांनी म्हटले.

रेझाई यांनी ठामपणे सांगितले की, इस्लामिक प्रजासत्ताकाच्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करू नये, याविषयी इराणला आंतरराष्ट्रीय हमी हवी आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, हा निर्णय इराणची जनता, सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई आणि सशस्त्र दले यांचा संयुक्त निर्णय आहे.

हे विधान अशा वेळी आले, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य-पूर्वेतील तणावाबाबत आपली भूमिका काहीशी सौम्य केली आणि असे संकेत दिले की, अमेरिका व इराण यांच्यात “अतिशय चांगल्या आणि फलदायी चर्चांना” सुरुवात झाली आहे; या चर्चांचा उद्देश वाढत्या संघर्षावर पूर्णपणे तोडगा काढणे हा आहे.

किंबहुना, ट्रम्प यांनी असेही सांगितले की, चर्चा अखंडपणे सुरू राहाव्यात यासाठी त्यांनी इराणमधील वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर नियोजित असलेले कोणतेही हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button