चिपळुणात ’वाशिष्ठी’च्या काठाला संरक्षण कवच


चिपळूण शहराच्या पूर सरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या ठरणार्या वाशिष्ठी नदीकाठावरील संरक्षण भिंत उभारणीच्या खर्चाला अखेर शासनाकडून प्रशासकीय मान्यता दिली गेली आहे गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करणार्या आमदार शेखर निकम याच्या प्रयत्नातून ही पूरसंरक्षक मित बांधण्यासाठी तब्बल २४ कोटी ९९ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याने बहादूरशेख नाका ते वागडे मौहल्ला परिसरातील नागरिकांना पुराच्या धोक्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे.
२००५च्या महापुरात शहरातील नलावडा बंधारा फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या फुटलेल्या बंधार्यातून नदीतील पुराचे पाणी सातत्याने शंकरवाडी, मुरादपूर भागात येत होते त्यानंतर आमदार शेखर निकम यांनी नलावडा बंधारा बांधकामासह वाशिष्ठी नदी किनार्यावरील भागात संरक्षण मित उभारण्याच्यादृष्टीने तत्त्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा चालवला त्यातूनच गतवर्षी कोट्यवधी रुपये खर्चुन नलावडा बंधारा ठिकाणी नव्याने मोठी संरक्षण भिंत उभारण्यात आली. परिणामी यंदाच्या पावसाळ्यात शहरात पाणी घुसले नाही. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहराला कायमस्वरुपी संरक्षण मिळावे यासाठी आमदार शेखर निकम यानी नदीकाठी सर्वत्र संरक्षण भिंत उभारण्याचा पाठपुरावा सुरू ठेवला होता शहरातील बहादूरशेख पुलापासून वांगडे मोहल्ला पर्यंतचा परिसर वाशिष्ठी नदीच्या काठावर वसलेला असून येथे मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे विशेषतः २२ व २३ जुलै २०२१ रोजी आलेल्या भीषण पुरामुळे वा भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून घराचे व मालमतेचे मोठे नुकसान झाले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button