
चिपळूण तालुक्यातील नागावे नदीपात्रालगत असलेल्या भंगार प्लास्टिकचा साठा असलेल्या गोडावूनला अचानक लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण इमारत भस्मसात
चिपळूण तालुक्यातील नागावे नदीपात्रालगत असलेल्या भंगार प्लास्टिकचा साठा असलेल्या गोडावूनला अचानक लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण इमारत भस्मसात झाली. या इमारतीत काम करत असलेल्या सहा कामगारांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर पडून आपला जीव वाचवला.शनिवारी सायंकाळी साधारण ४ वाजताच्या सुमारास घडली.
एका भंगार व्यवसायिकाला भाडेतत्वावर दिली होती. संबंधित ठिकाणी भंगार प्लास्टिक पिशव्या धुवून व सुकवून त्यापासून कच्चा माल तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. सुमारे तीन ट्रक इतका मोठा प्लास्टिक साठा येथे होता. दरम्यान, इमारतीलगत वाढलेले गवत शेतीकामासाठी पेटवण्यात आले होते. कडक उन्हामुळे ही आग वेगाने पसरत जाऊन प्लास्टिक साठ्यापर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळेच ही आग वणव्यामुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



