
मुलाने केली बापाला मारहाण
रत्नागिरी शहरातील झाडगाव येथे गाडीसाठी गावची जागा विकत नसल्याच्या
रागातून मुलाने बापाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेश शंकर पांचाळ (५०, रा. झाडगाव रत्नागिरी) असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे. राजेश यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाण प्रकरणी त्यांनी मुलाविरुद्ध शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. ओंकार राजेश पांचाळ (रा. झाडगाव रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
गुन्ह्यातील माहितीनुसार १८ मार्च रोजी राजेश हे कामातून घरी आले होते. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा ओंकार याने शिरगाव येथील त्यांच्या जागेवरुन वाद घालण्यास सुरुवात केली. गावची जमीन विकून मला गाडी घेवून द्या अशी मागणी ओंकार याने राजेश यांच्याजवळ केली. दरम्यान आपण गावची जागा विकणार नाही असे राजेश यांनी स्पष्ट केले. जागा विकण्यास नकार देत असल्याच्या रागातून ओंकार याने लाकडी दांडक्याने राजेश यांना मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेले राजेश यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच राजेश यांनी ओंकार याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी ओंकार याच्याविरुद्ध वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
www.konkantoday.com




