
मंडणगड शहरातील शासकीय धान्य गोदाम परिसरात खाजगी गाड्यांचे पार्किंग
मंडणगड शहरातील शासकीय धान्य गोदाम परिसरात महसूल विभागाच्या परवानगी शिवाय केल्या जाणार्या खासगी वाहनांच्या वाहनांच्या पार्किंगमुळे विविध समस्या उभ्या ठकल्या आहेत. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने या समस्यवेर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.
बाजारपेठ परिसरात पार्किंगची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने तालुक्यातील बाजारात खरेदीसाठी येणारे नागरिक शासकीय धान्य गोदामाच्या परिसरात आपल्या गाड्या उभ्या करतात. याशिवाय परिसरातील स्थानिक व्यापारी व नागरिकांची वाहनेही तेथेच उभी करण्यात येत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः दुचाकी व लहान गाड्यांची मोठी गैरसोय होते. तसेच दुर्गवाडी, सापटेवाडी परिसरात पायी चालत जाणार्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागतो.
www.konkantoday.com




