
डॉ. खान केमिकल्स स्फोटातील गंभीर जखमी कामगाराचे निधन
खेड : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील डॉ. खान इंडस्ट्रीयल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात रिऍक्टर चा स्फोट होऊन जखमी झालेल्या ११ कामगारांनपैकी रघुनाथ खंडू खामकर ( वय ५७ रा, मुरडे शिंदेवाडी, ता. खेड ) या गंभीर जखमी कामगाराचा नवी मुंबई ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये मंगळवारी पहाटे निधन झाले आहे.
दिनांक ६ मार्च रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये ११ कामगार भाजले असून त्यापैकी गंभीररीत्या भाजलेल्या नंदकिशोर राणे ४५ दभिल खोतवाडी, रणजित सुभाष राणे ४० दाभिल खोतवाडी, सुजन गोपाळ दास सुपरवायझर २९ रा. आवाशी माळवाडी, निखिल रवींद्र मोरे ३४ शिरळ मोरेवाडी त. चिपळूण, फिर्यादी शिवानंद बाबुराव खोंडे ३२ लोटे धापसेवाडी मूळ राहणार अहमदपूर जि. लातूर या कामगारांना चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. परशुराम रुग्णालयात असद इमाममुद्दीन खान ४४ पटवर्धन लोटे, अरमान जुनेद शाह २९ विक्रमगंज पटणा बिहार, समीर इनायतुला शेख २२ अहमदपूर जि. लातूर, यांना दाखल करण्यात आले आहे. तर ऐरोली येथील बर्न रुग्णालयात महंमद इलियास मुरूम मुश्ताक शेख २७ पटणा बिहार, परवेझ सादिक शेख २२ अहमदपूर लातूर मयत रघुनाथ खंडू खामकर वय ५७ रा मुरडे शिंदेवाडी यांना दाखल करण्यात आले होते.
स्फोटाची कारण गुलदस्त्यात
स्फोटानंतर फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी करून अपघाताची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला, तर वसाहतीचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी यांनी देखील कंपनीत पाहणी केली असली तरी स्फोटाचे मुख्य कारण अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे बोलले जात आहे. घटने आधी झालेल्या कंपनीच्या सुरक्षा तपासणी मध्ये नक्की कोणती तपासणी करण्यात आली असा सवाल आता येथील ग्रामस्थ विचारत आहेत.



