
३२ नाही तब्बल ४२ दात, हा माणूस आहे की राक्षस? X-Ray पाहून डॉक्टर्स हादरले, आणखी ३ दात येत आहेत बाहेर!
Guinness World Record Viral : मलेशियातील एका ३३ वर्षीय व्यक्तीच्या तोंडात तब्बल ४२ दात आहेत. त्यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे. या अनोख्या दातांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून तुम्ही देखील अवाक् व्हाल.
हे जग अजब-गजब लोकांनी भरलेलं आहे. याची जाणीव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ही संस्था वारंवार करून देते. यावेळी देखील त्यांनी अशाच एका अनोख्या व्यक्तीचा सन्मान केला आहे. या व्यक्तीनं सर्वाधिक दात असण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. सर्वसाधारणपणे माणसाकडे ३२ दात असतात. पण या विक्रमवीर व्यक्तीकडे ४२ दात आहेत. आणि आश्चर्य म्हणजे त्याला आणखी ३ नवे दात येत आहेत. म्हणजे पुढील काही दिवसांत त्याच्याकडे ४५ दात असतील. या विक्रमवीराच्या दातांचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.
ही घटना मलेशियामध्ये घडली आहे. दातांमुळे व्हायरल होत असलेल्या ३३ वर्षीय तरुणाचं नाव प्रताब मुनियंडी आहे. त्याच्याकडे सामान्य माणसांच्या तुलनेत १० दात जास्त आहेत. २०२३ मध्ये प्रताब दंतवैद्यांकडे तपासणीसाठी गेला. डॉक्टरांनी घेतलेल्या विविध चाचण्यांमध्ये हे सिद्ध झालं की, प्रताबच्या तोंडात ४२ दात आहेत. आणि गंमत म्हणजे आणखी ३ दात येणे बाकी आहेत. त्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला.
४२ दातांचा शोध लागला कसा?
SMILE 😁
Prathab Muniandy from Malaysia has 42 teeth, 10 more than usual, meaning he holds the record for most teeth in a person’s mouth (male) 🦷 pic.twitter.com/NmWrPyGVUw
— Guinness World Records (@GWR) March 5, 2026
२०२१ मध्ये प्रताब आपल्या कुटुंबीयांसोबत चहापान करत असताना त्याच्याकडे खूप जास्त दात असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो म्हणतो, “आम्ही दात मोजले तेव्हा ते ३८ होते.” त्यानंतर त्यानं जबड्याचा एक्स-रे काढून घेतला. तेव्हा त्याला ४२ दात असल्याची माहिती मिळाली. मात्र या अतिरिक्त दातांमुळे त्याला अद्याप कोणताही त्रास झालेला नाही. पण जास्त दात असल्यामुळे त्याला जास्त काळजी घ्यावी लागते. दरम्यान, या विक्रमवीर तरुणाच्या दातांचे फोटो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं @GWR या एक्स हँडलवरून शेअर केले आहेत. हे फोटो आतापर्यंत ४ लाख ७४ हजारांहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत.



