
विद्यार्थिनींच्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाला वर्षा ढेकणेंचे सहकार्य
रत्नागिरी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चा दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका सौ. वर्षा ढेकणे यांच्या पुढाकाराने व भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व त्यांचे स्वीय्य सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाने आयफर व डॉ. जे. एस. केळकर मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील व कौशल्य विकास आधारित विविध अभ्यासक्रम/ प्रशिक्षण कार्यक्रम यात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या सुमारे ५० हून अधिक विद्यार्थिनींना शैक्षणिक आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले.
यावेळी आयफरचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. हृषिकेश केळकर, संचालक अनिरुद्ध फळणीकर, गीतांजली लेले आदींनी सौ. वर्षा ढेकणे तसेच प्रदेशाध्यक्ष चव्हाण व श्री. पटवर्धन यांचे विशेष आभार मानले व संस्थेतर्फे सौ. वर्षा यांना आभाराचे पत्र देखील सुपूर्द करण्यात आले.
त्यावेळी भाजपा रत्नागिरी शहराध्यक्ष परशुराम उर्फ दादा ढेकणे, जिल्हा चिटणीस तथा पदवीधर प्रकोष्ठचे संयोजक मनोज पाटणकर, नगरसेविका मानसी करमरकर, महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस नूपुरा मुळ्ये, महिला मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी तसेच भाजपा रत्नागिरी शहरातील पदाधिकारी तसेच याप्रसंगी रत्नागिरी महिला मोर्चातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित विविध कार्यक्रम देखील त्यावेळी चालू असल्याने शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




