रत्नागिरीच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा

‘मिनी थियेटर’ ७ मार्चला होणार खुले

रत्नागिरी : रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि कला विश्वासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. शहराची वाढती सांस्कृतिक गरज लक्षात घेऊन आणि स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीत एक सुसज्ज ‘मिनी थियेटर’ उभारण्यात आलेले आहे. या मिनी थिएटरचे उद्घाटन ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता अरिहंत मॉल येथील रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र येथे पार पडणार आहे. या मिनी थिएटरचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
या नव्या नाट्यगृहामुळे रत्नागिरीची सांस्कृतिक चळवळ अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे.

या मिनी थिएटरची एकूण आसन क्षमता ३०० असून लघु नाट्यछटा, कार्यक्रम, स्नेहसंमेलने यांसारख्या कार्यक्रमांसाठी हे मिनी थिएटर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला कला व संस्कृतीची दीर्घ परंपरा लाभलेली आहे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे याला अधिक मोठे स्वरूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे या मिनी थिएटरच्या उद्घाटन कार्यक्रमात स्थानिक रत्नागिरीकर, कलाकार, रंगकर्मींनी आवर्जून उपस्थित रहावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button