चिपळूण नगरपालिकेत प्रशासकीय राजवटीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा लोकप्रतिनिधींचा आरोप


चार वर्षाच्या प्रशासकीय नगरपरिषदेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला. ठराव झुगारुन जागेची खरेदी करुन लाखो रुपये का दिले असा प्रश्न उपस्थित केला. शहरातील मोकळ्या जागाही विकल्याचा आरोप करीत प्रशासनाला धारेवर धरले. याबाबत तक्रार करण्याचा इशारा देतानाच यासाठी लवकरच विशेष सभा घेण्याचे ठरवण्यात आले. ७ तास चाललेल्या या सभेत नगर परिषदेचा २०२६-२०२७सालचा १६४ कोटीचा, ८ कोटी शिलकीच्या कोणतीही करवाढ नसलेल्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे यांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या तालीम सभागृहात ही सभा पार पडली. सभेसाठी प्रशासनाची तितकीशी नसलेली तयारी पाहून नगराध्यक्ष सकपाळ यांच्यासह नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करीत गेली चार वर्षे प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्याने ते असे वागत असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. प्रशासकीय राजवटीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे गटनेते शशिकांत मोदी यांनी केला/त्याला नगरसेवकांनी दुजोरा देत जुने विषय चर्चेला घेतले.
बायपास येथील रस्त्यासाठी जागा घेण्यासाठी मोबदला देण्याचा ठराव २०११ साली झाला. त्यानंतर २०१६ साली साठेखत झाले. मात्र २०१८ साली मोचदला देऊ नये असा ठराव झाला. तरीही प्रशासकीय राजवटीत संबधित मालकांना ९६ लाख रुपये देण्यात आले आहेत. हा भ्रष्टाचार नाही का यांनी काही मोकळ्या जागांही संगनमताने विकल्याचा आरोप मोदी यांनी केला हे गंभीर आहे. याची चौकशी झाली पाहिजे, अनेक बाबी पुढे येतील असे मत नगरसेवक फैसल कास्कर यांनी मांडले यालाही अनेक, नगरसेवकांनी पाठिंबा देत चौकशी झालीध पाहिजे अशी भूमिका घेतली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button