देवरुख मध्ये ६० वर्षीय वृद्धाला सायबर भामट्यांनी तब्बल ९४ हजार ८०० रुपयांना गंडवले


देवरूख शहरासह परिसरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांचे सत्र सुरूच असून सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. कालच इंस्टाग्रामवरील एका फेक प्रोफाइलद्वारे तरुणाला ५४ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका ६० वर्षीय वृद्धाला सायबर भामट्यांनी तब्बल ९४ हजार ८०० रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.भामट्यांनी विविध आमिषे दाखवून व ऑनलाईन जाळ्यात ओढून या वृद्धाची मोठी आर्थिक फसवणूक केली. अवघ्या २४ तासांत एकापाठोपाठ एक घडलेल्या या दोन मोठ्या घटनांमुळे देवरुख आणि आसपासच्या परिसरात तीव्र खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पीडित ६० वर्षीय व्यक्तीने तत्काळ देवरुख पोलीस ठाण्यात धाव घेतली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button