इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीऑनलाईन प्रवेशाकरिता मुदत वाढ


रत्नागिरी, दि. 27 ):- शैक्षणिक वर्ष सन 2025-26 पासून राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी असलेल्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी व वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी बारावी नंतरचे (बी.ए/बी.कॉम / बी.एस.सी. अशा उच्च शिक्षण घेणाऱ्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या वर्षात व्यावसायिक व बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमाकरीता वरील सर्व योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता 10 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांनी दिली आहे. ज्या इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांनी सदर योजनांचे अर्ज अद्यापही भरलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी सदर योजनांचे अर्ज 10 मार्च 2026 पर्यंत https:hmas.mahait.org या संकेतस्थळावर तात्काळ अर्ज भरून त्याची प्रत संबंधीत वसतिगृहात/कार्यालयात जमा करावी , असे आवाहन सहाय्यक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कुवारबाव , इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह मुरुगवाडा, इतर मागास बहुजन कल्याण मुलींचे शासकीय वसतिगृह शांतीनगर, रत्नागिरी येथे संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button