पत्रकार प्रशांत हरचेकर यांना पितृशोक

रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथील माजी प्राथमिक शिक्षक तसेच सेवाभावी व्यक्तिमत्व चंद्रकांत विठ्ठल हरचेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते पत्रकार प्रशांत हरचेकर यांचे वडील होत. मृत्यूसमयी त्यांचे वय ९२ वर्षे होते.

चंद्रकांत हरचेकर यांनी खेड, महाड, चिपळूण आदी ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत राहून आपली सेवा बजावली. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात त्यांनी शिक्षणाची ज्योत तेवत ठेवत अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या शांत, संयमी आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे व जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्व बनले होते.

दिनांक २६ फेब्रुवारी रोजी रात्री दीडच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. २७ फेब्रुवारी रोजी मावळंगे येथील वैकुंठभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्रकार प्रशांत हरचेकर यांच्यासह विवेक, विलास, विकास असे चार मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मावळंगे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका सेवाभावी व आदर्श शिक्षकाच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button