
मंडणगडतालुक्यातील पालवणी येथे अठरा वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
मडणगडतालुक्यातील पालवणी चेकपोस्ट परिसरात एका १८ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडलीऐश्वर्या किसन पवार (वय १८, मूळ रा.यड्रामी, जि. कलबुर्गी, कर्नाटक; सध्या रा. पालवणी फाटा, मंडणगड) असे मृत तरुणीचे नाव आहे. ऐश्वर्या ही १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता आपल्या राहत्या घरातून निघून गेली होती. त्यानंतर सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास पालवणी चेकपोस्ट येथील बैठकीच्या हॉलजवळ असलेल्या एका काजूच्या झाडाच्या फांदीला तिने आपल्या ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले.




