
मुबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील सावर्डे येथे रस्ता ओलांडताना कंटेनरच्या जोरदार धडकेत पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
मुबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील सावर्डे येथील जुने पोलीस स्टेशनसमोर रस्ता ओलांडताना कंटेनरच्या जोरदार धडकेत पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली. हा अपघात आज दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास झाला.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पादचारी रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने त्याला जोरदार धडक दिली. मात्र धडक देऊन कंटेनर चालक वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला. याची माहिती मिळताच सावर्डे पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून संबंधित चालकास असुर्डे येथे ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला




