रायगड जिल्ह्यातील शिवकालीन चंद्रगड उर्फ ढवळगड किल्ल्याकडे शासनाचे दुर्लक्ष


रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात चंद्रगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात येणार होते. मात्र ते आजही कागदावर राहिले आहे. पर्यटन विभागामार्फत राज्यातील किल्ले व पर्यटन स्थळांचा विकास करण्यात आला असला तरी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात शिवकालीन ऐतिहासिक ठेवा शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिला आहे.
त्याप्रमाणे इतर गडकिल्ल्यावर प्रदक्षिणा मोहीम आखली जाते. त्याच धर्तीवर चंद्रगड मोहीम आखल्यास या गडाचा इतिहास पुहा उजेडात येईल. शिवकालीन व्यवस्था दूरदृष्टी अभ्यासता येईल, अशी अपेक्षा गडप्रेमींनी व्यक्त केली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button