
विलुप्त कोकण किचन रेसिपीज बहारदार चविष्टतेता अदभूत आविष्कार
एस पी हेगशेट्ये कॅालेज ॲाफ हॅाटेल मॅनेजमेंट ॲड हॅास्पीटॅलीटी तर्फे आयोजित भव्य थीम डिनर “ विलुप्त कोकण “ पाचशे हजार वर्षांपूर्वीच्या अस्तंगत होणाऱ्या कोकणी रेसीपींना नवा साज घेऊन येत आहेत.
हॅाटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांच्या लाइव्ह प्रॅक्टिकल चा भाग असणारा हा उपक्रम यावेळी “ विलुप्त कोकण “ ही अनवट थीमसह येत आहे. उद्या दि ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वा. राज्याचे उद्योग आणि भाषा मंत्री, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होत आहे.कोकणच्या पर्यटन आणि हॅाटेलींग उद्योगाला संशोधनात्मक नवा आयाम देणारा हा अत्यंत अभिनव उपक्रम आहे. आपण या उपक्रमात सहभागी व्हा आणि मनमुराद आस्वाद घ्या.
या शाही खानपान थीम मध्ये आपणाला सध्या माहित नसलेले मात्र या कोकणच्या मातीशी छत्रपती शिवरायांच्या दरबारी काळापासून जोडलेले अनेक पदार्थ आहेत. यांत शाकाहारी मध्ये तिवाल पेय, गरम हुलग्याचे मांडगे, पंगोजी, काकडीचा कोरडो, खारे बडेर, शहाळे काजू तोंडाक, बटाटा हूमण, डक्कू डाळ, आंबोळी, मांसाहारी- मत्स्याहारी मध्ये कोलिम भजी, कारवारी चिकन, मटन धान शिकोरी, बांगडा उपकरी, वाल कोळंबी भात, किसमूर, मिरचीचे झीट मिटले, खांतोळी आणि खुप काही.
ही संधी आपण चुकवू नका! खवैयासाठी विशेष !




