
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 223 एसटी बसेस गाड्यांची व्यवस्था
रत्नागिरी जिल्ह्यात शनिवार दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 1 हजार 693 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.या पार्श्वभूमीवर मतदानाच्या आदल्या दिवशी शुकवारी जिल्ह्यातील विविध केंद्रावर मतदान साहित्य तसेच तेथे नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहतुकीसाठी 223 एसटी बसेस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बंदोबस्तासाठी पोलिस, होमगार्ड आणण्यासाठी स्वतंत्र 35 बसेस नाशिकला पाठवण्यात येणार आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेसाठी शुक्रवार, शनिवारी जिल्ह्यातील स्थानिक मार्गावरील शालेय फेऱ्या बंद राहतील. लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू राहरणार आहे तर खासगी कंपन्यात काम करणाऱ्या कर्मचारी, व्यापारी यांच्यासाठी कार्यालयीन वेळेत, जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी एसटी बसेस धावतील.




