
भूमिगत ऑप्टिकल फायबर केबलच्या खोदकामामुळे महावितरणचे पावणे चार
गणपती कृपाच्या विरुद्ध दिशेला भूमिगत ऑप्टिकल फायबर केबलच्या कामासाठी खोदकाम करून महावितरणचे तीन कोटी ७८ लाख ९०८ रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी मे. दिनेश इंजिनिअरिंगचे मुकादम राजेश हळदणकर याच्यावर शनिवारी रात्री येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महावितरणचे सहाय्यक अभियंता सिद्धार्थ पेटकर यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. २५ जानेवारी रोजी सकाळी ११.४.५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याठिकाणी महावितरण कंपनीची विद्युतवाहिनी असल्याने खोदकाम न करण्याबाबत सांगूनही भूमिगत ऑप्टिकल फायबरच्या केबलसाठी खोदकाम केले. यामुळे महावितरणच्या ११ किलो व्होल्टची भरणे फिडरच्या विद्युतवाहिनीचे पावणे चार कोटी रूपयांचे नुकसान केले. यामुळे वेरळ परिसरात सलग ९ तास विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. नुकसान केल्याचा ठपका ठेवत संबंधित मुकादमावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.www.konkantoday.com



