भारतीय टपाल विभागतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्र लेखन स्पर्धा


रत्नागिरी, दि. 3 ):- भारतीय टपाल विभागतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पधेचे विषय तुमच्या मित्राला/ मैत्रिणीला डिजिटल जगात मानवी संबंध का महत्वाचा आहेत याबद्दल पत्र लिहा. ज्या मुलांचे वय 5 मे 2026 रोजी 15 वर्षे पेक्षा जास्त नाही अशी मुले स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. पत्र लेखन मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतच करावे. लिहण्यात येणारा संदेश पत्राच्या स्वरुपात असावा व शब्द संख्या 800 पेक्षा जास्त नसावी. अर्जावरील वय शाळेच्या अधिका-यांनी प्रमाणित केलेले असावे. अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2026 आहे.
ही स्पर्धा 8 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत होईल.
या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांना सर्कल स्तरावर प्रथम बक्षिस 25 हजार रुपये, द्वितीय बक्षिस 10 हजार रुपये, तृतीय बक्षिस 5 हजार रुपये व प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. पहिल्या तीन क्रमांकाना राष्ट्रीय स्तरावर प्रथम बक्षिस 50 हजार रुपये, द्वितीय बक्षिस 25 हजार रुपये, तृतीय बक्षिस 10 हजार रुपये व प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.
तसेच स्पर्धेचे ठिकाण प्रत्येक शाळेला कळविण्यात येईल.सर्कल स्तरावरील 3 बक्षीसपात्र पत्रे राष्ट्रीय स्तरावर पाठविली जाणार आहेत आणि त्यानंतर येथे पुन्हा नंबर काढण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन डाकघर अधीक्षक डी. एस. कुलकर्णी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button