रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार कुणी केला? संशयितांची नावं आली समोर


बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पुणे पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत पाच संशयितांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे.या प्रकरणात पाच संशयितांना ताब्यात घेतल्या नंतर आता पोलिसांना या प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ मिळाला आहे.

संशयितांची नावे

पुण्यातील वारजे पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आता समोर आली आहेत. अमान मोरोटे (२७), आदित्य गायकी (१९), सिद्धार्थ येनपुरे (२०), समर्थ पोमाजी (१८) आणि स्वप्नील सकट (२३) अशी ताब्यात घेतलेल्या पाचही संशयितांची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाच जणांपैकी चार संशयितांना घेऊन मुंबई पोलिसांचे पथक पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. उर्वरित पाचव्या आरोपीलाही थोड्याच वेळात मुंबई क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे. रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे.पोलिस तपासात ताब्यात घेतलेले पाचही संशयित देशातील कुख्यात गँगशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गँगचे नेटवर्क पुणे, मुंबईसह इतर राज्यांमध्ये पसरले असल्याचा संशय पोलिस व्यक्त करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button