जितेंद्र चव्हाण यांची मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कडवई येथील नेते जितेंद्र चव्हाण यांची मनसेच्या मध्य रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर चव्हाण यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनसेच्या स्थापनेपासून जितेंद्र चव्हाण हे राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून कार्यरत आहेत. विविध जनआंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी यादववाडी ब्रिज आणि कडवई रेल्वे स्थानकासह स्थानिक प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. जनहिताच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारा लढवय्या कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button