
भाट्ये खाडीच्या मुखाशी संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा पर्यावरणीय परिणाम काय होणार याचा अभ्यास सुरू
आसमंत बेनिव्होलम्स फाउंडेशन आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माट्धे खाडीच्या मुखाशी सुरू असलेल्या संरक्षक भिंतीच्या बांधकामामुळे परिसरातील किनारी रचनेत आणि गाळाच्या वहनात होणार्या संभाव्य बदलांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे.
संरक्षक भिंतीच्या बांधकामामुळे खाडीच्या मुखाची रूपरेषा तसेच किनारपट्टीची नैसर्गिक रचना बदलण्याची शक्यता आहे. परिणामी, लाटांच्या दिशेत व वर्तनात तसेच
गाळाच्या बहन आणि साठवणकीच्या प्रक्रियेत बदल होऊ शकतात. या बदलांचा शास्त्रीय पद्धतीने मागोवा घेणे हा या अभ्यासाचा प्रमुख उद्देश आहे. अभ्यासाच्या प्रारंभिक टप्प्यात खाडीच्या मुखाजवळील संरक्षक भिंतीच्या दक्षिण आणि उत्तर बाजूंच्या भागातून ठरावीक ठिकाणी गाळाचे नमुने घेतले जात आहेत.



