मुंबईत गणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट, भुलेश्वरच्या राजा’ची २२ फुटी बाप्पाची मूर्ती अचानक कोसळली, २ जणांचा मृत्यू, ५ गंभीर


गणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट लावणारी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना मुंबईतील भुलेश्वर परिसरात घडली आहे. भायखळ्याहून मोठ्या थाटामाटात आणल्या जाणाऱ्या ‘भुलेश्वरच्या राजा’ची २२ फूट उंच मूर्ती मंडपापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर असताना अचानक समतोल बिघडून कोसळली.या भीषण दुर्घटनेत दुर्दैवाने दोघांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे बाप्पाच्या आगमनाचा आनंद क्षणात शोकात बदलला असून संपूर्ण भुलेश्वर परिसरात तीव्र हळहळ आणि शोककळा पसरली आहे.शनिवारी रात्री १० वाजता भुलेश्वरमधील डॉ. आत्माराम मर्चंट रोड, कबुतरखाना, जय आंबे चौक येथे भुलेश्वरच्या राजा गणपतीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान २२ फुटांपेक्षा जास्त उंचीची गणपतीची मूर्ती कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी एकाची ओळख गणपती मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे अशी पटली आहे. अध्यक्षासह ३८ वर्षीय ब्रिजेश हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, मूर्ती लालबागहून भुलेश्वरला नेली जात होती. तिचे तीन तुकडे झाले आणि नंतर मंडळाच्या सदस्यांनी ती एका डम्परवर ठेवून विसर्जनासाठी नेली, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “मूर्तीला आधार देणाऱ्या फ्रेमचे वेल्डिंग बहुधा व्यवस्थित झाले नव्हते. त्यामुळे, मूर्ती फ्रेममधून मधून निसटून खाली पडली. ते जवळपास मंडपाजवळ पोहोचले होते, तेव्हा ही घटना घडली. जखमी झालेले लोक बहुधा मूर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीवर बसले होते.” सात जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button