भरणे-खेड मार्गावर दुचाकी घसरून अपघात; दोघे जखमी

खेड : खेड-भरणे मार्गावर पटेदार भवनजवळ दुपारी १२.४६ वाजण्याच्या सुमारास दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले.

खेडहून धवडे येथे जात असलेली MH 08 AD 0079 क्रमांकाची दुचाकी पटेदार भवनजवळ घसरल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली तैनात असलेली जगद्गुरू रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, नाणीजधाम यांची २४ तास अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत असलेली विनामूल्य रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली.

या अपघातात प्रिया प्रेम मोरे (वय २५, रा. धवडे) आणि प्रेम मोरे (वय २८) हे दोघे जखमी झाले. त्यांना संस्थानच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तत्परतेने सेवा बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button