लक्ष्मी ऑरगॅनिकने दडवलीय माहित, माजी खासदार हुसेन दलवाई यांचा आरोप


खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने शासन व जनतेपासून बरीच माहिती दडवली असल्याचा आरोप माजी खासदार हुसेन दलवाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. त्यामुळे कंपनीचे हर्षवर्धन गोयंका, रवी गोयंका, डॉ. राजन व्यंकटेश यांच्याकडून कंपनीविषयी माहिती मागवण्यात आली असून ती आल्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, पिपाससारख्या घातक रसायनाचा वापर करून कंपनी कोकणातील जनतेच्या जीवाशी खेळत आहे. त्यामुळे आम्ही संघर्ष समितीच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी धरणे आंदोलन करीत कंपनीला विरोध दर्शवला आहे. यावेळी झालेल्या बैठकीत कंपनीने दिशाभूल करणारी माहिती दिली असून कंपनी सुरू करताना शासनापासूनही बर्‍याच बाबी लपवल्या असल्याचे आम्हाला वाटत आहे. त्यामुळे कंपनीविरोधातील लढा संपला नसून उलट तो अधिक तीव्र केला जाणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button