लोकशाही मार्गाने स्वतंत्र कोकण राज्यासाठी लढा उभारणार, स्वतंत्र कोकण अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे


कोकणातील भौगोलिक, आर्थिक, सामाजिक व प्रशासकीय परिस्थितीचा सखोल विचार करून कोकणी जनतेला स्वतःची ओळख, हवक, स्वाभिमान व न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कोकण राज्य होणे गरजेचे आहे. यासाठी संपूर्ण कोकणात विभागात ’कोकण राज्य अभियान’ सुरू करत असल्याची माहिती स्वतंत्र कोकण अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांनी चिपळूण येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, स्वतंत्र कोकण राज्याची मागणी करणे म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे होतील, अशी कोणतीही भीती निरर्थक असून ही मागणी केवळ आपल्या भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उचललेले एक सकारात्मक पाऊल आहे. उर्वरित महाराष्ट्रासाठी वैधानिक विकास मंडळ स्थापन झाले तरी त्यामध्ये कोकणावर अन्यायच झाल्याची
भावना कोकरे यांनी व्यक्त केली. शासकीय सेवेत कोकणी माणूस केवळ दहा टक्के असून उर्वरित पदांवर परजिल्ह्यातील व्यक्ती कार्यरत आहेत, ही कोकणासाठी शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतंत्र कोकण राज्य झाल्यास फक्त कोकणी माणूसच कोकणी माणसाचे भवितव्य ठरवेल, अशी व्यवस्था निर्माण होईल आणि ही भूमिका सर्वच क्षेत्रातील विकासासाठी लागू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button