
रत्नागिरी नजिकच्या चांदसूर्या खेडशी येथे एटी-दुचाकीचा अपघात, दोन जखमी
रत्नागिरी नजिकच्या चांदसूर्या खेडशी येथे एस्टी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह पाठीमागे बसलेल्या सहकार्याच्या पायाला गंभीर दुखापत होऊन दोघांचेही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. या अपघातातील जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीप सखाराम आंबेकर (४२) आणि रंजन महादेव खापरे (५६) हे दोघे बुधवारी सायंकाळी डफळचोळवाडी येथून रत्नागिरीच्या दिशेने दुचाकीवरून निघाले होते. त्याचवेळी हातखंबा येथून रत्नागिरीकडे जाणारी एस्टी बस येत होती. डफळचोळ वाडीच्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येत असताना दुचाकीला एस्टी बसची जोरदार धडक बसली. या धडकेत दिलीप आंबेकर व रंजन खापरे यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन दोघांचेही पाय फ्रॅक्चर झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अपघाताची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.www.konkantoday.com




