पारदर्शकता, कार्यक्षमता आणण्यासाठी रत्नागिरी पोलिसांकडून हायटेक ’बंदोबस्त ऍप’ कार्यान्वित


रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिक-केंद्रीत पोलिसिंग, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांतर्गत पोलीस व नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाते कृत्रिम बुद्धिमत्तेवर (­Al-­Artificial Intelligence) आधारित ’बंदोबस्त ऍप’ विकसित केले.
’जिल्ह्यात साजरे होणारे विविध सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंदोत्सव तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या भेटी व हालचालीदरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो. या बंदोबस्ताचे दियोजन अधिक सुसूत्र, शिस्तबद्ध
आणि परिणामकारक व्हावे, तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांना प्रभावी नियंत्रण ठेवता यावे, या उद्देशाने हे ऍप विकसित करण्यात आले आहे. या बंदोबस्त ऍपच्या माध्यमातून बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेला प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदाराला बंदोबस्त पॉईंट व कर्तव्य डिजिटल पद्धतीने कळविले जाते. संबंधित अधिकारी/अंमलदार ऍपद्वारे आपली ऑनलाईन हजेरी नांदवू शकतात. लॉगिन केल्यानंतर त्यांच्या मोबाईलमधील जिओ लोकेशन वरिष्ठ प्रभारी अधिकारी व थेट पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांना लाईव्ह मॉनिटर करता येते. तसेच नेमून दिलेल्या बंदोबस्त पॉईंटच्या बाहेर कोणी अधिकारी/अंमलदार गेल्यास त्याबाबतचा अलर्ट मेसेज तात्काळ वरिष्ठ अधिकार्‍यांना प्राप्त होतो. त्यामुळे बंदोबस्तावर सतत लक्ष ठेवणे शक्य होत असून, बंदोबस्त अधिक शिस्तबद्ध, प्रभावी व परिणामकारक ठरणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button