
जीजीपीएसच्या प्री प्रायमरी विभागाने साजरा केला पतंगोत्सव

रत्नागिरी : पौष महिन्यात येणार्या मकर संक्रांती या सणाला एकमेकांना तिळगुळ देण्याची प्रथा आहे पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट या महिन्यात करतात आणि जी सर्वांनाच आवडते ती म्हणजे पतंग उडवणे. जी.जी.पी.एसच्या स्वामी स्वरूपानंद प्री प्रायमरी विभागाने आपल्या चिमुकल्यांसाठी पतंग उत्सवाचे आयोजन केले होते. झरी विनायक भाट्ये बीच येथे सकाळी 7.30 ते 9.00 या वेळेत हा पतंगोत्सव साजरा केला गेला. या पतंगोत्सवासाठी पालकांनी आपल्या पाल्यांसोबत हजेरी लावून पतंगोत्सवाचा आनंद घेतला. शाळेकडून मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
या पतंगोत्सवासाठी प्री प्रायमरी विभागाच्या प्रमुख सौ.शुभदा पटवर्धन मॅडम,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली पाटणकर, प्राथमिक विभागाच्या सौ.अपूर्वा मुरकर यांचे या पतंगोत्सवासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले.




