इंडियन स्टुडंट कौन्सिलचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

अभिनेत्री विभावरी देशपांडे, किशोरी पेडणेकर व प्रा. डॉ. सरिता भवानी मालविय यांचा होणार गौरव

पुणे : इंडियन स्टुडंट कौन्सिलतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय सावित्रीच्या लेकी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, यंदा हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री विभावरी देशपांडे, राजकीय क्षेत्रातील मुंबईच्या माजी माहपौर किशोरी पेडणेकर मुंबई व संशोधन क्षेत्रातील प्रा. डॉ. सरिता मालविय, उत्तरप्रदेश यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता म. फुलेवाडा, समता भूमी, गंजपेठ, पुणे येथे अभिनेत्री सुषमा देशपांडे व कवी व गायक अरुण म्हात्रे या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम, उपाध्यक्ष प्रा. माधुरी राऊत यांनी दिली आहे.

लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, विज्ञानभिमूखता व राष्ट्रवाद ही पंचसूत्री आदर्श मानून ‘माहिती व तंत्रज्ञान युगातील विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक यांची समतावादी संघटना’ हे घोषवाक्य घेऊन स्थापन झालेल्या इंडियन स्टुडंट कौन्सिलने अवघ्या ५ वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. ग्रामीण, कष्टकरी विद्यार्थ्याचे व विनाअनुदानित तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षक प्राध्यापकांचे निकडीचे प्रश्न अग्रक्रमाने हाती घेऊन धसास लावणारी, इथल्या सामाजिक प्रश्नांबद्दल जाण व आस्था असणारी ही एकमेव संघटना आहे. गेल्या पाच वर्षांपासून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘सावित्रीच्या लेकी’ पुरस्कार विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करत आहे. याहीवर्षी हा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
आत्तापर्यंत सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेत्री स्पृहा जोशी, सुहिता थत्ते, पर्ण पेठे, अश्विनी गिरी, तर राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या माजी आमदार विद्या चव्हाण, खासदार फौजीया खान, माजी आमदार यशोमती ठाकूर, पत्रकार सरिता कौशिक, प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख, डॉ. भावना पाटोळे , प्राचार्य डॉ. मीता रामटेके, प्रा. डॉ. प्रज्ञा लोखंडे, प्रा. डॉ. माधवी महाके यांना प्रदान करण्यात आला आहे.
आतापर्यंत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. बाबा आढाव, डॉ. श्रीपाल सबनीस, प्रा. सुभाष वारे, ज्येष्ठ कवी व गायक अरूण म्हात्रे, उल्हास पवार, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

या पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनासाठी प्रा. डॉ. धनाजी थोरे, प्रा. डॉ. माधवी महाके, प्रा. डॉ. रोहित गायकवाड, प्रा. डॉ. मीता रामटेके, प्रा. डॉ. रेखा बडोदेकर, प्रा. आरती खातू, प्रा. क्लापना सिद्धेवाड, सारिका शिंदे, सुवर्णा शिंदे, सोनिया इथापे, सौ. मीना साळुंके, प्रा. डॉ. नीता कदम हे परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button