
निवळी रांबोळीकरीन देवस्थानसमोरील विहिरीत उडी मारून तरूणाची आत्महत्या
मुंबई-गोवा महामार्गालगत निवळी रांबोळीकरीन देवस्थानसमोरील विहिरीत उडी घेत तरूणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. महेंद्र गोविंद सनगरे (४०, रा. हातखंबा, सनगरेवाडी) असे मृताचे नाव आहे. सोमवारपासून सनगरे हे बेपत्ता झाले होते. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत नोंद करण्यात आली होती. महेंद्र हे १२ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. मात्र काम संपल्यानंतर ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी दुसर्या दिवसापासून त्यांचा शोध सुरू केला. अखेर बेपत्ता असल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. १४ जानेवारी रोजी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास निवळी येथील रांबोळकरीन देवस्थानसमोर असलेल्या एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी त्यांची बॅग, चप्पल व मोबाईल फोनही सापडले. ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव यानी घटनास्थळी भेट दिली.www.konkantoday.com




