इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत नवनिर्माण हायस्कूलचा १०० टक्के निकाल

सानवी शिवाजी गवस झळकली राज्य गुणवत्ता यादीत

रत्नागिरी : राज्य कला संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या एलिमेंट्री व इंटरमिजिएट या ड्रॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये येथील नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करत १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे या यशामध्ये शाळेतील एक विद्यार्थीनी राज्य गुणवत्ता यादीत झळकली आहे.

इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेसाठी शाळेतील एकूण ३६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेत सानवी शिवाजी गवस या विद्यार्थिनीने राज्य गुणवत्ता यादीत ३७ वे स्थान मिळवण्याचा मान पटकावला. तसेच डिझाईन विषयात राज्यात चौथा क्रमांक मिळवत तिने शाळेच्या यशात भर घातली आहे. त्याचप्रमाणे एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेला प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या परीक्षेचाही निकाल १०० टक्के लागला आहे. कलाशिक्षक निखिल कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button