जनसेवक प्रतिष्ठानच्या कोकण विभागीय संपर्क प्रमुखपदी दिलीप जाधव यांची निवड

गुहागर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाचे उपाध्यक्ष दिलीप जाधव यांची ‘महाराष्ट्र राज्य जनसेवक प्रतिष्ठान’च्या ‘कोकण विभागीय संपर्क प्रमुख’ पदी निवड करण्यात आली आहे.

श्री. जाधव यांनी आजवर सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य आहे. सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता, अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या याच प्रामाणिक आणि निस्वार्थी जनसेवेची दखल घेऊन, जनसेवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पिंटू (भाऊ) गोरे यांनी ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे.

जाधव यांची कोकण विभागीय संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याचे वृत्त समजताच गुहागरसह संपूर्ण कोकणातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
“लोकाभिमुख काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जेव्हा मोठे व्यासपीठ मिळते, तेव्हा समाजकारणाला अधिक गती मिळते. दिलीप जाधव यांच्या निवडीमुळे कोकणात जनसेवक प्रतिष्ठानचे कार्य अधिक जोमाने वाढेल,” अशा भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button