
मुंबईजवळील शहरात भूकंपाचे धक्के जाणवले, दुपारच्यानंतर रात्रीही गावं हादरलं
मुंबईजवळील पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालघर आणि जव्हार तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास संपूर्ण पालघर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.२ इतकी नोंद झाली आहे. सुदैवाने अद्याप कुठेही जीवित वा वित्तीय हानी झाली नाही. मात्र, भूकंपाच्या धक्के जाणवल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या पूर्व आणि उत्तर भागात पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरू झालं आहे. पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाने हादरला आहे. साडेनऊ वाजताच्या सुमारा पालघरच्या काही भागात भूकंपाचा हादरे जाणवले. भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. रिश्टर स्केलवर 3.2 इतकी भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली आहे.




