
तळवली येथे फिरत्या वैद्यकीय पथकातर्फे आरोग्य तपासणी
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत तळवली येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिमकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तळवली येथील सभागृहात फिरत्या आरोग्य पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली.
तळवली ग्रामपंचायतीच्या सरपंच मयुरी शिगवण यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराला प्रारंभ झाला. यावेळी आरोग्य तपासणीमध्ये हिमोग्लोबिन तपासणी, आयुष्यमान कार्ड, आभाकार्ड, त्याचप्रमाणे कीटकजन्य आजाराविषयी मौलिक माहिती ग्रामस्थांना कीटक शास्त्रज्ञ परीक्षित वाडकर यांनी दिली. त्यानंतर इकोफ्रेंडली डास निर्मूलन याबद्दल माहिती देण्यात येऊन या फिरत्या वैद्यकीय आरोग्य पथकाचा आरोग्य तपासणीचा लाभ बहुसंख्याने महिला, पुरुष ग्रामस्थांनी घेतला.
या आरोग्य तपासणीच्या वेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश मोहिते, डॉ. वैभव तोंडे, तसेच फार्मासिस्ट प्रज्योत नरोटे, तालुका कीटक शास्त्रज्ञ परीक्षित वाडकर, आरोग्य सेवक विकास दुपटे, ग्राम महसूल अधिकारी हनुमंत भिसे, आशा गटप्रवर्तक संचित म्हसकर, आशा सेविका निकिता पवार, सायली कळंबटे, शीतल सांगळे तसेच फिरते पथकाचे चालक शशिकांत जगधने आदींनी या आरोग्य पथकाचे काम पाहिले. या आरोग्य तपासणी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.




