
आबलोली व्यापारी संघटनेतर्फे ११ रोजी विविध कार्यक्रम
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील व्यापारी संघटनेतर्फे रविवारी (११ जानेवारी) श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हा संपूर्ण कार्यक्रम चंद्रकला उद्योग समूह मैदान येथे साजरा करण्यात येणार आहे.
११ रोजी सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा होणार असून, १० वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ होईल. सायंकाळी ७ वाजता स्थानिक मंडळींचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री ९ वाजता ज्येष्ठ व्यापारी यांचा सत्कार कार्यक्रम होई. त्यानंतर रात्री १० वाजता रत्नागिरीच्या माऊली महिला नमन मंडळाचा महिलांचा बहुरंगी, बहुढंगी नमानाचा कार्यक्रम होईल.
या संपूर्ण कार्यक्रमाचा आबलोली पंचक्रोशीतील जनतेने लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ऋषिकेश बाईत, उपाध्यक्ष विजय पागडे, सेक्रेटरी शैलेश दिंडे, खजिनदार सुनील दाते यांच्यासह सर्व व्यापारी सदस्य व व्यापारी संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.




