
रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे पाडावेवाडीत बिबट्याचे २ बछड्यांसह दिवसाढवळ्या दर्शन
रत्नागिरी शहराला लागून असलेल्या मिरजोळे परिसरात बिबट्याचा वावर आणि हल्ले यामुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. गावातील येथील सोनारवाडी भागात बिबट्याने एकाच रात्रीत ४ गुरांना ठार केल्याची खळबळजनक घटना मागील महिन्यात उघडकीस आली होती. त्यानंतर २ दिवसांपूर्वी वाडीतून एका घराजवळ बांधलेल्या कुत्र्याची शिकार केली. आता गुरुवारी पाडावेवाडीत दिवसाढवळ्या बिबट्याचे दोन बछड्यांसह दर्शन झाल्याने ग्रामस्थ अधिकच भयभीत झाले आहेत.
मिरजोळे सोनारवाडी, गुरववाडी परिसरातील हल्ला पाणि गुरववाडीतही यापूर्वी झालेल्या बिबट्याच्या दर्शनामुळे ग्रामस्थांच्या मागणीने जोर धरला आहे. त्यानंतर पाडावेवाडीतील दत्ताराम पाडावे यांच्या घराच्या बाजूला अंगणात साळखदंडाने बांधून ठेवलेल्या कुत्र्याला ५ दिवसांपूर्वी मानेचा चावा घेऊन बिबट्या पसार झाला होता. मात्र गेल्या मंगळवारी रात्री येऊन त्या कुत्र्याला बिबट्याने ओढून रानात नेल्याची घटना घडली.www.konkantoday.com




