खेड तालुक्यातील वेरळमध्ये बंद घर फोडून लाखाची रोकड लंपास


खेड तालुक्यातील वेरळ येथे आठवडाभरात झालेल्या दुसर्‍या घरफोडीने पोलिसांची झोप उडाली असून ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. केतन वसंत मोरे यांच्या बंद घराचे दरवाजे तोडून कपाटातील १ लाख २० हजाराची रोकड चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा चोरट्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठवडाभरापूर्वी वेरळ-खडकवाडी येथील दिनेश दिलीप पवार यांच्या घरातून चोरट्याने साडेतीन लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. या चोरीप्रकरणातील चोरटा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या पाठोपाठ मूळचे वेरळ येथील रहिवासी व सध्या दादर-मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या केतन मोरे यांच्या मानकीच्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. कपाटात ठेवलेल्या १ लाख २० हजाराच्या रोकडसह चोरट्याने पलायन केले. येथे आल्यानंतर घरफोडी झाल्याचे निदर्शनास येताच पोलीस ठाणे गाठत त्यांनी तक्रार नोंदवली. आठवडाभरात झालेल्या दुसर्‍या घरफोडीने परिसरात चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button