संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे थेराडेवाडी येथे दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू


संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे थेराडेवाडी येथील पर्‍याच्या पुलावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातात सुशांत सुरेश कदम (३१, रा. कुचांबे बौद्धवाडी) याचा मृत्यू झाला.
२५ डिसेंबर रोजी सकाळच्या दरम्यान कुचांबे ते आरवली मार्गावर हा अपघात घडला. सुशांत कदम हे दुचाकीवरून (एमएच ०४ जेडी ६७०६) प्रवास करत होते. त्यांच्या मागे प्रताप दिलीप कदम हे बसले होते. रस्ता वळणाचा व चढ-उताराचा असताना परिस्थितीचा अंदाज न घेता दुचाकी चालवल्याने समोरून आरवलीकडून येणारा टाटा कंपनीचा मालवाहू ट्रक (एमएच ०८ एच ०८४५) दिसताच अचानक ब्रेक मारल्याने दुचाकी घसरली. दुचाकी रस्त्यावर घसरत जाऊन समोरून येणार्‍या ट्रकच्या उजव्या बाजूच्या मागील टायरला धडकली. यात सुशांत कदम यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला तर मागे बसलेले प्रताप कदम हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत पोलीस हवालदार संदेश सीताराम जाधव यांनी फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एस. गावीत करीत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button