
रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला येथे किरकोळ वादातून भाऊ भावजयला मारहाण
रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला येथे किरकोळ वादातून भाऊ व भावजयला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. प्रवीण पंढरीनाथ विलणकर व पर्णिका प्रवीण विलणकर (५१, रा. दोन्ही पेठकिल्ला) अशी मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पर्णिका यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मारहाणप्रकरणी नितीन पंढरीनाथ विलणकर (५२, रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. पर्णिका यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार १३ डिसेंबर रोजी रात्री त्या कुत्र्यांना खायला घालत होत्या. यावेळी आरोपी नितीन विलणकर हा त्या ठिकाणी आला. तसेच कुत्र्याला खायला देत असल्याने कुत्री त्रास देतात, असे नितीन याने सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. यातून नितीनने काठीने भाऊ प्रवीण विलणकर व भावजय पर्णिका यांना मारहाण केली अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




