
पूर्णेकर हत्येप्रकरणी कुटुंबियांच्या मागणीप्रमाणे मुख्य आरोपीला अटक करा अन्यथा अख्खा महाराष्ट्र ठाण्यात येईल, – खासदार संजय राऊत
ठाण्यात राजकीय वादातून पुन्हा रक्ताचा सडा पडलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून राजकीय वादातून ही हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.या प्रकरणी कुटुंबियांकडून माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्यावर सातत्याने आरोप करण्यात आहे. आरोपींच्या अटकेशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. एवढच नाही तर पूर्णेकर हत्येप्रकरणी कुटुंबियांच्या मागणीप्रमाणे मुख्य आरोपीला अटक करा अन्यथा अख्खा महाराष्ट्र ठाण्यात येईल, असा इशारा खासदार संजय राऊत यांचा कापूरबावडी पोलिसांना दिला. अखेर त्यानंतर या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी पुरवणी एफआयआर दाखल करण्यात आली असून, यात माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदेंचा उल्लेख संशयित आरोपी म्हणून करण्यात आला आहे. प्रदीप पूर्णेकरांचं पार्थिव पोलीस स्टेशन समोर आणून पूर्णेकर कुटुंबाने ठिय्या आंदोलन केलं.. अखेर संजय राऊत, आदित्य ठाकरे ठाण्यात आल्यानंतर त्यांनी पूर्णेकर कुटुंबासह पोलीस स्टेशनमध्ये जात पोलिसांची भेट घेतली. पूर्णेकर कुटुंबाच्या तक्रारीनंतर मीनाक्षी आणि राजेंद्र शिंदेंच्या नावाचा उल्लेख पुरवणी एफआयआरमध्ये करण्यात आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंदरम्यान प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येचे मूख्य सूत्रधार राजेंद्र शिंदे आणि मिनाक्षी शिंदे असल्याचा आरोप संजय राऊतांसह पूर्णेकर कुटुंबानं केला. दरम्यान जोपर्यंत सूत्रधारांना अटक होत नाही तोपर्यंत प्रदीप पूर्णकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही असाही इशारा पूर्णेकर कुटुंबानं दिला.
पूर्णेकरांच्या ऑफिसमध्ये काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख होते. मंगळवारी रात्री आपल्या मानपाडा गणेशनगरधील कार्यालयात ते बसलेले होते. .यावेळी बाईकवरील आरोपींनी ऑफीसमध्ये घुसून सात राऊंड फायर केले यातील दोन गोळ्या लागल्याने प्रदीप पूर्णेकरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एवढंच नाही तर आरोपींनी चॉपरनंही पूर्णेकरांवर वार केले. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी पप्या शिंदेला ताब्यात घेतलं असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.. राजकीय वैमनस्य, क्लस्टरच्या वादातून हत्या झाल्याचा संशय आहे.. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती यांच्यावर पूर्णेकर कुटुंबाकडून गंभीर आरोप करण्यात आले.



