भारतीय जनता पक्षाचे माजी दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आज मोठा धक्कादायक निर्णय घेणार, स्टेटसवरून महायुतीच्या नेत्यावर साधला निशाणा


भारतीय जनता पक्षाचे माजी दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी काही निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. राजेश सावंत यांची कन्या व माजी आमदार बाळ माने यांची सून शिवानी सावंत -माने या उबाठाच्यावतीने नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आपण पदावर राहिलो तर पक्षाला योग्य तो न्याय देवू शकणार नाही. म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले होते. आपण पक्षातच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. असे असताना काल महायुतीच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राजेश सावंत यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यात त्यांनी निवडणुकीमध्ये नाती आड यायला लागल्याचे सांगून राजेश सावंत हे पार्टीचा भाग नाहीत असे सांगत कार्यकर्त्यांना त्यांनी राजेश सावंत यांचे स्टेटस बघणे सोडा असा सल्ला दिला होता. तसेच यापुढे कार्यकर्त्यांनी सचिन वहाळकर किंवा दीपक पटवर्धन हे काय म्हणतात ते पहावे असे सांगितले होते. यामुळे राजेश सावंत हे दुखावले गेल्याचे सांगण्यात येते. सावंत हे भाजपचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी तरूण भाजप कार्यकर्त्यांना एकत्रित करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती.
पक्षाच्यावतीने त्यांनी विविध उपक्रम राबविले होते. त्यामुळे हळुहळू भाजपकडे नवीन कार्यकर्ते आकर्षित होत होते. मात्र काल रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या टिकेमुळे राजेश सावंत हे दुखावले गेले आहेत. त्यामुळे सावंत हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. आज त्यांनी स्टेटसला मोदींचा फोटो ठेवला आहे व त्याखाली त्यांनी म्हटले आहे की मी भारतीय जनता पार्टीचे काम केले आहे त्याचा मला अभिमान आहे पण युतीतील नेत्याचे ऐकत नव्हतो हाच माझा दोष होता. हो.. भाजपसाठीच ऐकत नव्हतो. मला रविंद्र चव्हाण साहेब माफ करा, मी भाजपासाठीच काम करत होतो, असे म्हणून त्यांनी कुणाचे नाव न घेता महायुतीतील नेत्याला टार्गेट केले आहे.
एकूणच नाराज असलेले राजेश सावंत आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून त्याबाबत त्यांनी आज तातडीने पत्रकार परिषद बोलावली आहे. त्यात कदाचित ते धक्कादायक निर्णय घेवू शकतील असा अंदाज आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button