पोषण आहारातील तांदूळ चोरी प्रकरणावरून नाटे ग्रामसभेत जोरदार खडाजंगी


राजापूर तालुक्यातील नाटे येथील नावे नगर विद्यामंदिर शाळेतील पोषण आहारातील तांदूळ चोरी प्रकरणामुळे नाटे गावात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत या विषयावरून जोरदार खडाजंगी झाली. याप्रकरणी मुख्याध्यापक रवींद्र जाधव आणि सहाय्यक शिक्षक नाना करे यांना तात्काळ निलंबित करावे असा एकमुखी ठराव करत सरपंच संदीप बांदकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली. या ग्रामसभेदरम्यान आमदार किरण सामंत सभास्थळी पोहोचले व त्यांनी अत्यंत संयमाने हा विषय हाताळला. शाळेतील पोषण आहारातील तांदूळ चोरी प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणामुळे नाटे गावाची बदनामी झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button