
खेर्डी ग्रामपंचायतीचे शिवसेनेचे प्रकाश पाथरुड नवे सरपंच
चिपळूण येथील खेर्डी ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांनी शिवसेनेचा भगवा फडकला आहे. सरपंच पदाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रकाश पाथरुड यांनी राष्ट्रवादी पॅनेलचे उमेदवार प्रकाश साळवी यांचा निसटता पराभव केला.एकूण पंधरा सदस्यांनी मतदान केले त्यापैकी पाथरुड यांना ८मते साळवी यांना ७ मते पडली यापूर्वी राष्ट्रवादीच्या जयश्री खताते या सरपंचपदी होत्या.त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीतील एक गट व विरोधी पक्ष एकत्र आले त्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. अविश्वास ठराव मंजूर झाला होता त्यामुळे ही निवडणूक लागली हाेती.
www.konkantoday.com