
ज्येष्ठ क्रिकेटपटू भैय्या उर्फ केतन बाईंग यांचे निधन
*रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध ज्येष्ठ क्रिकेट खेळाडू भैय्या उर्फ केतन बाईंग यांचे दीर्घ आजाराने, दुःखद निधन झाले . त्यांच्या अकाली जाणीमुळे क्रिकेटप्रेमी आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.
भैय्या उर्फ केतन बाईंग हे केवळ क्रिकेट मैदानातील धुरंधर खेळाडू नव्हते, तर सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागी होते. त्यांचा मित्रपरिवार अतिशय मोठा होता आणि ते नेहमीच लोकांच्या भल्यासाठी पुढाकार घ्यायचे. नवरात्र उत्सव मंडळात त्यांचा विशेष सहभाग होता, जिथे ते उत्सवाच्या यशस्वीतेसाठी नेहमीच योगदान देत असत. अनेक सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा पुढाकार आणि उत्साह दिसायचा, ज्यामुळे ते सर्वांसाठी प्रेरणास्थान होते.




