रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणी पुन्हा एकदा १२ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ


रत्नागिरी शहरानजीकच्या रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणात गेले ६ महिने ’तारीख पे तारीख’ असा प्रवास सुरु आहे. जिल्हा न्यायालयाने पुन्हा एकदा नवीन तारीख दिली आहे. आता या प्रकरणी जिल्हा प्रशासनाला १२ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रकरणात नक्की कुणाच्या बाजूने निकाल लागतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून हिले आहे.
रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांनी नुकसानभरपाई द्यावी अथवा त्यांची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाकडून देण्यात आले होते. या प्रकरणी जिल्हा प्रशासनानेही मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. अचानक रिसॉर्ट बंद झाल्याने सावंत यांची ९ कोटी २५ लाख रुपये इतकी नुकसानभरपाई जिल्हा प्रशासनाने द्यावी, असा आदेश जिल्हा न्यायालयाकडून देण्यात आला होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button